काँग्रेसचे जीएसटी प्रणालीतील त्रुटींवर तीव्र टीका करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वस्तू आणि सेवा कर प्रणालीत सुधारणा करण्यासाठी धाडस दाखवण्याचे आवाहन केले आहे पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी पॉपकॉर्न लागू असलेल्या तीन वेगवेगळ्या जीएसटी स्लॅबचा उल्लेख करून सध्याच्या प्रणालीमुळे कर्तुक्वेगीरीला प्रोत्साहन मिळत असल्याचे सांगितले.
Popcorn वरील तीन जीएसटी स्लॅब आणि त्यावरील टीका
रमेश म्हणाले, ” पॉपकॉर्न वरील तीन वेगवेगळ्या जीएसटी स्लॅब ची व्यवस्था ही हास्यस्पद आहे. या जटी प्रणालीमुळे अनेक त्रुटी आणि कर चोरीच्या पळवटा निर्माण झाल्या आहेत सोशल मीडियावर या मुद्द्यावर अनेक memes व्हायरल झाल्या असून त्यांनी जीएसटी प्रणालीतील गुंतागुंतीचा प्रश्न अधोरेखित केला आहे.
जीएसटी प्रणालीतील समस्या काँग्रेसने म्हटले
की जीएसटी प्रणालीमुळे इनपुट टॅक्स क्रेडिट फसवणूक वाढली आहे आणि बोगस कंपन्यांच्या माध्यमातून करसुखव्यगिरीसाठी मार्ग मोकळा झाला आहे पॉपकॉर्न वर वेगवेगळे जीएसटी दर लागू केल्याने कर वर्गीकरणाची समस्या अधिक गहन झाली आहे.
पॉपकॉर्न वरील कर दरांचे स्पष्टीकरण जीएसटी कौन्सिलने शनिवारी स्पष्ट केले की प्रीपॅक केलेल्या आणि लेबल केलेल्या रेडी टू इट पॉपकॉर्न वर 12% जीएसटी लागेल तर कॅरमल युक्त पॉपकॉर्न वर 18% जीएसटी लागू होईल मात्र पूर्वी पॅक न केलेल्या पॉपकॉर्न वर पाच टक्के जीएसटी राहील. मोदी सरकारकडून gst कर सुधारणा अपेक्षित काँग्रेसने
मोदी सरकारला विचारले की, पंतप्रधान आणि अर्थमंत्री जीएसटी प्रणालीच्या पुनर्रचनेसाठी आवश्यक पाऊल उचलतील का? जीएसटी 2.0 झिरो तयार करण्यासाठी धाडस दाखवावे अशी मागणी पक्षाने केली आहे.
जीएसटी प्रणालीतील सुधारणांसाठी केंद्र सरकारकडून पुढाकार होणे आवश्यक असल्याचे काँग्रेसने म्हणणे आहे कारण या प्रणालीतील त्रुटी दूर केल्याशिवाय कर व्यवस्थित सूत्रता आणि पारदर्शकता येऊ शकत नाही.